युक्रेनमधील अणुप्रकल्पावर हल्ल्याचा रशियाचा डाव ; युक्रेनच्या अध्यक्षांचा दावा

रशियाने मात्र झेलेन्स्की यांच्या आरोपाचा इन्कार केला आहे. युक्रेनमधील झापोराझीया येथे असलेला हा अणुप्रकल्प रशियाच्या ताब्यात आहे
युक्रेनमधील अणुप्रकल्पावर हल्ल्याचा रशियाचा डाव ; युक्रेनच्या अध्यक्षांचा दावा

युरोपातील सर्वात मोठ्या अणुप्रकल्पावर दहशतवादी हल्ला करण्याचा रशियाचा कुटील डाव असल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी केला आहे. झेलेन्स्की यांच्या या दाव्याने युरोप हादरला आहे. रशियाने मात्र झेलेन्स्की यांच्या आरोपाचा इन्कार केला आहे. युक्रेनमधील झापोराझीया येथे असलेला हा अणुप्रकल्प रशियाच्या ताब्यात आहे.

झेलेन्स्की म्हणाले, ‘‘आमच्या गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार रशिया झापोराझीया येथील अणुप्रकल्पावर हल्ला करण्याची योजना आखत आहे. या प्रकल्पातून अणुसंसर्ग करण्याचा रशियाचा डाव आहे. रशियाने त्यासाठी सर्व तयारी केली आहे.’’ रशियाने नुसतेच युक्रेनमधील धरणावर हल्ला करून धरण फोडले आहे. या धरणाचे पाणी झापोराझीया अणुप्रकल्पात वापरले जात होते. युक्रेनच्या या दाव्याचा रशियाने मात्र साफ इन्कार केला आहे. रशियाच्या विदेशी विभागाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले की, ‘‘युक्रेनचा हा आणखी एक खोटारडेपणा आहे. इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीने नुकतेच झापोराझीया अणुप्रकल्पाचे परीक्षण केले आहे. त्यांनी या प्रकल्पाची सर्व बाजूंनी कसून तपासणी केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे अणुप्रकल्प प्रमुख राफेल ग्रोसी हेदेखील कालिनग्राड येथे लवकरच येत असून ते रशियाच्या अणुप्रकल्प प्रमुखांना भेटणार आहेत.’’

logo
marathi.freepressjournal.in