Poland : रशिया युक्रेन युद्धात पोलंडचा बळी; मिसाईल पडून पोलंडचे २ ठार

पोलंडमध्ये क्षेपणास्त्र पडून दोघांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी नाटो सदस्य देशांच्या प्रतिनिधींची तातडीची बैठक बोलावली
Poland : रशिया युक्रेन युद्धात पोलंडचा बळी; मिसाईल पडून पोलंडचे २ ठार

रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाद काही थांबण्याचे नाव घेत नाही. अशामध्ये युक्रेन सीमेजवळ असणाऱ्या नाटो सदस्य देश पोलंडमध्ये एक क्षेपणास्त्र पडल्याची बातमी समोर आली. यामध्ये २ जणांचा जीव गेल्याचेदेखील सांगण्यात येत आहे. अशामध्ये आधी हे मिसाईल रशियाचे असल्याची चर्चा होती. मात्र, नंतर हे मिसाईल युक्रेनचे असल्याचे सांगण्यात आले. पण, ही बातमी पसरताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी नाटो सदस्य देशांच्या प्रतिनिधींची तातडीची बैठक बोलावली. त्यामुळे आता तिसरे महायुद्ध होते की काय? अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलंडमध्ये जे मिसाईल पडले ते युक्रेनचे होते. युक्रेनी सैन्याने रशियाच्या हल्ल्यांना प्रत्यूत्तर देण्यासाठी हे क्षेपणास्त्र डागले होते. मात्र, या मिसाईलची दिशा चुकली आणि ते पोलंडमध्ये जाऊन पडल्याची माहिती देण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी देखील हे मिसाईल रशियाची असण्याची शक्यता कमीच असल्याचे म्हटले होते. कारण त्यानंतर एकही मिसाईल पोलंडच्या दिशेने आली नव्हती. तसेच रशियाकडूनही तशी काही हालचाल दिसली नव्हती. दुसरीकडे युक्रेन, पोलंडच्या सीमेवर रशियाने कोणताही हल्ला केलेला नाही, असे रशियाने म्हटले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in