रशियन हल्ल्यात भारतीय कंपनी उद्ध्वस्त

रशियाने युक्रेनच्या शहरांवरील हल्ले तीव्र केले आहेत. यात युक्रेनच्या सुमी प्रांतातील भारतीय समूहाच्या 'कुसुम ग्रुप'द्वारे चालवला जाणारा औषध निर्मिती कारखाना रशियन ड्रोन हल्ल्यात पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.
रशियन हल्ल्यात भारतीय कंपनी उद्ध्वस्त
रशियन हल्ल्यात भारतीय कंपनी उद्ध्वस्त
Published on: 

कीव्ह : रशियाने युक्रेनच्या शहरांवरील हल्ले तीव्र केले आहेत. यात युक्रेनच्या सुमी प्रांतातील भारतीय समूहाच्या 'कुसुम ग्रुप'द्वारे चालवला जाणारा औषध निर्मिती कारखाना रशियन ड्रोन हल्ल्यात पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

ड्रोन हल्ल्यानंतर कारखान्यातून धुराचे मोठे लोट उठताना दिसत आहेत. बचाव कार्य आणि नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मृतांच्या आणि जखमींच्या संख्येत बदल होऊ शकतो. कुसुम ग्रुपने १९९४ मध्ये युक्रेनमध्ये भारतीय औषधांचे वितरक म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. सध्या ही कंपनी भारतीय नागरिक राजीव गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली चालवली जाते. कंपनी स्वतःला युक्रेनियन कंपनी मानते.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in