युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास अणुयुद्धाचा धोका, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा इशारा

पाश्चिमात्य देशांनी युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास अणुयुद्धाचा धोका आहे, असा इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी गुरुवारी दिला. रशियात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक मार्चमध्ये होणार आहे. तत्पूर्वी पुतीन यांनी देशाला उद्देशून भाषण केले.
युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास अणुयुद्धाचा धोका, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा इशारा
(संग्रहित छायाचित्र)

मॉस्को : पाश्चिमात्य देशांनी युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास अणुयुद्धाचा धोका आहे, असा इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी गुरुवारी दिला. रशियात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक मार्चमध्ये होणार आहे. तत्पूर्वी पुतीन यांनी देशाला उद्देशून भाषण केले.

ते म्हणाले की, रशियाशिवाय जगात शांतता संभव नाही. पाश्चिमात्य देश रशिया व युक्रेनला उद‌्ध्वस्त करू इच्छितात. आमच्या अंतर्गत प्रश्नात कोणीही दखल देऊ नये. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या विशेष लष्करी मोहिमेत आम्हाला जनतेचे समर्थन मिळत असून युद्ध करणारे सैनिक हे हीरो आहेत. रशिया आपल्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे. अमेरिका रशियात फूट पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, आम्ही एकात्म राहून कोणत्याही परिस्थितीचा सामना करायला सज्ज आहोत. आम्ही कोरोना आणि दहशतवादाचा मुकाबला केला आहे, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, गेल्या १५ वर्षांपासून आम्ही अण्वस्त्रांचा वापर रोखण्याचा प्रस्ताव ठेवत आहोत, तर पाश्चिमात्य देश आम्हाला शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेत उतरवण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘नाटो’ देश आमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करत आहेत. ‘नाटो’च्या विस्तारानंतर रशियाला स्वत:चे संरक्षण करणे गरजेचे बनले आहे. आमच्याकडेही शस्त्रास्त्र आहेत. विशेष म्हणजे आमच्याकडे अशी शस्त्रास्त्रे आहेत, ज्यामुळे आम्ही त्यांना त्यांच्याच देशात हरवू शकतो. यातून अण्वस्त्र वापराला वाढावा मिळू शकतो, असा इशारा त्यांनी दिला.

रशिया हा अमेरिकेशी चर्चा करायला तयार आहे. पण, रशियन राष्ट्रीय सुरक्षाच्या मुद्दे सोडून अमेरिकेसोबत अन्य रणनीती स्थिरतेवर चर्चा करायला तयार आहोत. रशिया हा राजकारण सोडून नवीन जागतिक वित्त पायाभूत सुविधा क्षेत्र बनवण्याची योजना बनवत आहे. जो रशियावर हल्ल्याचा प्रयत्न करेल, त्याला दुसऱ्या महायुद्धाच्या तुलनेत अधिक गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही पुतीन यांनी दिला.

रशियाही जगातील चौथी अर्थव्यवस्था बनणार

गेल्यावर्षी रशियाने सर्व जी-७ देशांना मागे टाकले. लवकरच रशिया जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २०३० पर्यंत रशियाचा किमान वेतन ३५ हजार रुबल केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रशियात मार्चमध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक

रशियात १५-१७ मार्चला राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. निवडणुकीपूर्वीच पुतीन पुन्हा राष्ट्रपती बनणार हे निश्चित आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in