रशियाच्या चांद्रमोहिमेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. रशियाचे लुना-25 हे यान चंद्रावर कोसळल्याची माहिती प्राप्त झाली आहे.हा रशियाला मोठा धक्का मानला जात आहे. सुमारे 50 वर्षांतील पहिले रशियन चंद्र लँडर चंद्रावर कोसळले आहे.जर्मनीच्या डीडब्ल्यू न्यूजने स्पेस कॉर्पोरेशन रोस्कोसमॉसने रशियाचे अवकाशयान चंद्रावर कोसळल्याचं वृत्त दिलं आहे.या आधी शनिवारी अंतराळात लुना- २५ या यानात तांत्रिक बिघाड झाला असल्याची बातमी समोर आली होती. यानंतर हा बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरु होता. यानंतर याता हे लुना - २५ हे यान चंद्रावर कोसळल्याची माहिती समोर आली आहे.
रशियाचं लुना - २५ हे यान चंद्रावर कोसळ्याने रशियाची चांद्रयान मोहीम अयशस्वी ठरली आहे. यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिला देश ठरण्याचं रशियाचं स्वप्न भंगलं आहे. लुना-२५ हे यान २१ ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करणार होतं. मात्र, त्यातचं हे यान चंद्रावर कोसळलं असल्याचं रशियाने सांगितलं आहे.