ट्रम्प यांच्या शपथविधीला जयशंकर उपस्थित राहणार

अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी २० जानेवारीला होणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी भारतातर्फे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे उपस्थित राहणार आहेत.
अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, भारतातरचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (डावीकडून)
अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, भारतातरचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (डावीकडून)
Published on

नवी दिल्ली : अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी २० जानेवारीला होणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी भारतातर्फे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे उपस्थित राहणार आहेत.

परराष्ट्र खात्याने सांगितले की, ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात भारताचे प्रतिनिधीत्व जयशंकर करतील. ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदाची तर जे. डी. वान्स हे उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. अमेरिकेच्या दौऱ्यात जयशंकर हे अमेरिकेतील भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भेटी घेण्याची शक्यता आहे. अधिभार, वातावरण बदल, परदेश धोरणाचे प्राधान्यक्रम आदींबाबत ट्रम्प सरकारच्या धोरणाकडे जगातील सर्व देशांचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in