भारतीय वंशाचे सबिह खान Apple चे नवे COO; लवकरच घेणार जेफ विल्यम्स यांची जागा

ॲपल कंपनीने भारतीय वंशाचे सबिह खान यांची त्यांच्या नवीन चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीचा हा निर्णय त्यांच्या दीर्घकाळ नियोजित नेतृत्व संक्रमणातील एक महत्त्वाचे पाऊल आहे.
भारतीय वंशाचे सबिह खान Apple चे नवे COO; लवकरच घेणार जेफ विल्यम्स यांची जागा
Photo : X (@DepinBhat)
Published on

नवी दिल्ली : ॲपल कंपनीने भारतीय वंशाचे सबिह खान यांची त्यांच्या नवीन चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीचा हा निर्णय त्यांच्या दीर्घकाळ नियोजित नेतृत्व संक्रमणातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. ॲपलमध्ये ३० वर्षांपासून कार्यरत असलेले आणि सध्या ऑपरेशन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष असलेले ५८ वर्षीय खान या महिन्याच्या अखेरीस जेफ विल्यम्स यांची जागा घेतील, असे आयफोन निर्मात्याने एका निवेदनात म्हटले आहे.

१९९५ मध्ये ॲपलच्या खरेदी गटात सामील होण्यापूर्वी त्यांनी जीई प्लास्टिकमध्ये ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट इंजिनिअर आणि की अकाउंट टेक्निकल लीडर म्हणून काम केले.

१९६६ मध्ये उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे जन्मलेले खान अमेरिकेत स्थायिक होण्यापूर्वी शालेय काळात सिंगापूरला गेले. त्यांनी टफ्ट्स विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये दुहेरी पदवी आणि रेन्सेलेर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट (आरपीआय) मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांनी कंपनीत जवळजवळ तीन दशके महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. २०१९ मध्ये ते वरिष्ठ उपाध्यक्ष (ऑपरेशन्स) बनले.

logo
marathi.freepressjournal.in