गाझा पट्टीत पत्रकाराच्या कुटुंबाची आहुती

युद्धामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचे हृदयद्रावक भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. मुले, महिला आणि नागरिकांना या हल्ल्यात लक्ष्य केले जात आहे.
गाझा पट्टीत पत्रकाराच्या कुटुंबाची आहुती

तेल अवीव : इस्रायल आणि हमास यांच्यात आता निकराची लढार्इ सुरू झाली आहे. गाझा पट्टीत जमिनी हल्ला करणे कठीण असल्यामुळे इस्रायलने हवार्इ हल्ल्यावर भर दिला आहे. यामुळे हमासला संपवण्याच्या प्रयत्नात सुक्याबरोबर ओले देखील जळू लागले आहे. या युद्धाची इत्यंभूत माहिती देणाऱ्या अल‌् जझिरा चॅनेलच्या एका पत्रकाराला मात्र आपल्या संपूर्ण कुटुंबाची आहुती द्यावी लागली आहे. गाझा पट्टीमधील अल‌् जझिराचे मुख्य वार्ताहर वेल दहदौह यांची पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातू या युद्धात ठार झाल्याची माहिती हाती आली आहे.

इस्रायलनेही आक्रमक पवित्रा घेऊन दक्षिण भागातील नागरिकांना गाझा पट्टी सोडण्याचे आवाहन केले होते. परंतु, येथे राहून येथील घडामोडींचे वार्तांकन करण्याच्या उद्देशाने अल‌् जझिराचे मुख्य वार्ताहर वेल दहदौह त्यांच्या कुटुंबीयांसह गाझातील निर्वासित छावण्यांमध्ये राहिले. इस्रायलने बुधवारी नुसिरत निर्वासित छावणीत हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यात वेल यांचा सात वर्षांचा मुलगा योहिया, १५ वर्षांची मुलगी शाम, पत्नी आणि एक नातू यांचा जीव गेला आहे. धक्कादायक म्हणजे वेल दहदौह युद्धाचे वार्तांकन करत होते. त्याचवेळी हा हल्ला झाला. हल्ल्याची माहिती मिळताच वेल हल्ल्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी आपल्या रक्ताळलेल्या मुलांना आपल्या कुशीत घेतले.

युद्धामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचे हृदयद्रावक भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. मुले, महिला आणि नागरिकांना या हल्ल्यात लक्ष्य केले जात आहे. मी यार्मौककडून अशा हल्ल्याबद्दल अहवाल घेत होतो, तेवढ्यात इस्रायलने नुसिरतसह अनेक भागांना लक्ष्य केले, अशी माहिती वेल यांनी पत्रकारांना दिली. आपल्या कुटुंबीयांचे मृतदेह पाहण्यासाठी गेलेल्या वेल यांच्या अंगावर प्रेसचे जॅकेटही होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in