कुराण जाळणाऱ्या सलवान मोमिका याची स्वीडनमध्ये हत्या; TikTok वर लाइव्ह असतानाच घातल्या गोळ्या

स्वीडनमध्ये मशि‍दीसमोर निदर्शने करताना कुराण जाळणाऱ्या सलवान मोमिका याची घरात घुसून गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.
कुराण जाळणाऱ्या सलवान मोमिका याची स्वीडनमध्ये हत्या; TikTok वर लाइव्ह असतानाच घातल्या गोळ्या
एक्स @KarishmaVoice
Published on

स्टॉकहोम : स्वीडनमध्ये मशि‍दीसमोर निदर्शने करताना कुराण जाळणाऱ्या सलवान मोमिका याची घरात घुसून गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सलवान मोमिका याने २०२३ मध्ये कुराणची प्रत जाळली होती. यावरून मुस्लिम देशांनी प्रचंड टीका केली होती.

स्टॉकहोममध्ये राहणारा इराकी नागरिक सलवान मोमिका टिकटॉकवर लाइव्ह असतानाच, त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. सलवान मोमिकाचा मृतदेह बुधवारी रात्री उशिरा सोडरतालजे येथील त्याच्या राहत्या घरी आढळला. सलवान मोमिकाने इस्लामचा विरोध करत असताना २०२३ मध्ये कुराणची प्रत जाळली होती. याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. स्टॉकहोम न्यायालयात या केसची सुनावणी होती. गुरुवारी सलवान मोमिका याला कोर्टात हजर व्हायचे होते, पण त्यापूर्वीच त्याची हत्या करण्यात आली. ही बातमी कळल्यानंतर न्यायालयातील प्रकरणाची सुनावणी स्थगित करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in