पाकिस्तान: १७ वर्षीय टिक टॉक स्टार सना युसूफची हत्‍या

पाकिस्‍तानमधील १७ वर्षांची टिक टॉक स्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सना युसूफ हिची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
पाकिस्तान: १७ वर्षीय टिक टॉक स्टार सना युसूफची हत्‍या
Published on

इस्लामाबाद : पाकिस्‍तानमधील १७ वर्षांची टिक टॉक स्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सना युसूफ हिची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना राजधानी इस्‍लामाबादमध्‍ये घडली.

सनाला भेटण्‍यासाठी आलेल्‍या नातेवाईकाने तिच्‍यावर गोळीबार केला. हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेला असून, ऑनर किलिंगसह या घटनेमागील सर्व संभाव्य कारणांचा तपास सुरू आहे.

स्‍थानिक माध्‍यमांनी दिलेल्‍या वृत्तानुसार, हल्लेखोर हा सनाचा नातेवाईक आहे. तो घरी आला, सनावर अंदाधुंद गोळीबार केल्‍यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. दोन गोळ्या लागल्याने सनाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू केला आहे, आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in