सानिया मिर्झा अन् शोएब मलिक घटस्फोट घेणार? सानियाच्या 'इंस्टाग्राम स्टोरी'ने चर्चांना उधाण

दोन्ही दिग्गज खूप दिवसांपासून वेगळे असून बऱ्याच दिवसांपासून एकत्र दिसले नाहीत. असे असले तरी, घटस्फोटाबाबत या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
सानिया मिर्झा अन् शोएब मलिक घटस्फोट घेणार? सानियाच्या 'इंस्टाग्राम स्टोरी'ने चर्चांना उधाण

भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरु असतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. आता सानियाने ठेवलेल्या इंस्टाग्राम स्टोरीवरुन पुन्हा त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे.

"लग्न अवघड आहे, घटस्फोटही अवघड आहे. तुम्ही तुमचा मार्ग निवडा. वाढलेले वजन ही अवघड बाब आहे. तसेच, फिट राहणेदेखील कठीण आहे. कर्जबाजारी राहणे अयोग्य आहे. बोलणे कठीण आहे. अबोला ठेवणे कठीण आहे. आयुष्यात कोणतीच गोष्ट सोपी नाही. पण, योग्य मार्ग निवडणे तुमच्या हातात आहे", अशी स्टोरी तिने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

सानियाने शेअर केलेल्या स्टोरीवरुन ती घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तसेच, दोघे खूप दिवसांपासून वेगळे असून बऱ्याच दिवसांपासून एकत्र दिसले नाहीत. असे असले तरी, घटस्फोटाबाबत या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

2010 मध्ये लग्न झाले होते लग्न-

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या प्रेम प्रकरणाच्या चर्चा रंगल्या होत्या. यानंतर 12 एप्रिल 2010 रोजी दोघांनी लग्न केले होते. 2018 मध्ये सानियाने एका मुलाला जन्म दिला होता. सानिया आणि शोएब अनेकदा आपल्या मुलासोबत इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावरील पोस्टमध्ये दिसतात. पण, दोघेही एकत्र दिसत नाहीत. आता सानियाच्या इंस्टाग्राम स्टोरीने सोशल मीडियावर पुन्हा त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in