रियाध : सौदी अरेबियाचे राजकुमार अल वालिद बिन खालिद बिन तलाल अल सौद यांचे शनिवारी निधन झाले. ते गेल्या २० वर्षांपासून कोमात होते. त्यांना ‘स्लीपिंग प्रिन्स’ म्हणून ओळखले जात असे.
प्रिन्स अल वालिद हे सौदी राजघराण्यातील ज्येष्ठ सदस्य प्रिन्स खालेद बिन तलाल यांचे पुत्र आणि अब्जाधीश प्रिन्स अल वालिद बिन तलाल यांचे पुतणे होते. त्यांचा जन्म एप्रिल १९९० मध्ये झाला. २००५ मध्ये लंडनमध्ये लष्करी प्रशिक्षणादरम्यान त्यांना एक मोठा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आणि अंतर्गत रक्तस्त्राव झाला. त्यानंतर ते कोमात गेले होते.