न्यूयॉर्कमधील शाळांनाही दिवाळीची सुट्टी

दिवाळीला न्यूयॉर्क शहरातील शाळांना सुट्टी राहील. विद्यार्थ्यांना दिवाळीत सुटी मिळावी
न्यूयॉर्कमधील शाळांनाही दिवाळीची सुट्टी

अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. न्यूयॉर्कमधील शाळांनाही आता दिवाळीत सुट्टी मिळणार आहे. न्यूयार्क शहराचे महापौर एरीक एडम्स यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली. एडम्स म्हणाले, दिवाळीला न्यूयॉर्क शहरातील शाळांना सुट्टी राहील. विद्यार्थ्यांना दिवाळीत सुटी मिळावी, यासाठी विधानसभा सदस्य जेनिफर राजकुमार आणि भारतीय समुदायांनी प्रयत्न केला होता.

जेनिफर या न्यूयॉर्क स्टेटच्या प्रतिनिधी सभेसाठी निवड झालेल्या पहिल्या भारतीय-अमेरिकी महिला आहेत. त्या म्हणाल्या, न्यूयॉर्क सिटी पब्लिक स्कूलमध्ये दिवाळीत सुट्टीसंबंधी विधेयक पारित करण्यात आले आहे. यंदापासून दिवाळीत न्यूयॉर्क शहरातील शाळांना सुटी असेल.

अमेरिकी संसदेतही दिवाळी सुट्टीचे विधेयक सादर

गेल्या महिन्यात अमेरिकी संसदेतही दिवाळीत सुट्टी मिळावी म्हणून विधेयक सादर करण्यात आले आहे. अमेरिकेतील खासदार ग्रेस मेंग यांनी यूएस काँग्रेसमध्ये यासंबंधीचे विधेयक सादर केले. दिवाळीत संपूर्ण अमेरिकेत सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in