बर्ड फ्लूच्या H5N1स्ट्रेनच्या संसर्गाने अनेक मांजरींचा मृत्यू ; मानवालाही संसर्ग होण्याचा WHOचा इशारा

नवीन साथीच्या रोगाचा उद्रेक होण्यास H5N1 स्ट्रेन कारणीभूत ठरु शकतो, असं देखील जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
बर्ड फ्लूच्या H5N1स्ट्रेनच्या संसर्गाने अनेक मांजरींचा मृत्यू ; मानवालाही संसर्ग होण्याचा WHOचा इशारा
Published on

जगभरात बर्ड फ्लूचा धोका वाढताना दिसत आहे. धोकादायक बाब म्हणजे. बर्ड फ्लू माणसांमध्ये संक्रमीत होऊ शकतो ही नवी माहिती समोर आली आहे. अनेक देशांमध्ये एव्हीयन फ्लू म्हणजेच बर्ड फ्यूचा उद्रेक वाढताना दिसत आहे. यात फक्त पक्षांचाच नाही तर मांजरींचा देखील मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे जगभरता चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलंडमध्ये अचानक अनेक मांजरींचा मृत्यू झाला आहे. या मांजरींचा मृत्यू बर्ड फ्लू चा संसर्गामुळे झाल्याचं बोललं जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार पोलंडमध्ये मोठ्या संख्येमृत्यू झालेल्या मांजरींची चाचणी केली असता निम्म्याहून अधिक नमुन्यामंध्ये H5N1 स्ट्रेन सापडला आहे. H5N1 हा स्ट्रेन बर्ड फ्लूचा असल्याचं जागकित आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं एका निवेदनात देशातील विस्तृत भौगोलिक क्षेत्रामध्ये जास्त संख्येने संक्रमीत मांजरींचा हा पहिला अहवाल असल्याचं म्हटलं आहे. यावेळी WHO ने पक्ष्यांमध्ये आढळणारा बर्ड प्लूचा हा स्ट्रेन मानवांमध्ये प्रसारित होण्याची शक्यता आहे, असा इशारा दिला आहे. नवीन साथीच्या रोगाचा उद्रेक होण्यास या स्ट्रेन कारणीभूत ठरु शकतो, असं देखील जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

मृत मांजरींच्या संपर्कातील माणसांमध्ये या स्ट्रेनचा संक्रमण झाल्याचं अद्याप आढळलेलं नाही. या व्यक्तींना काही काळ देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. पण, संक्रमित मांजरींच्या संपर्कातील कोणत्याही व्यक्तीला या स्ट्रेनचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in