इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये शाहबाज शरीफ हे सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरूढ झाले आहेत. पाकिस्तानचे ते २४ वे पंतप्रधान असून त्यांना नॅशनल असेंब्लीमध्ये २०१ खासदारांचा पाठिंबा मिळाला, तर ९२ खासदारांनी ‘पीटीआय’ समर्थक उमेदवार उमर अयुब यांना मतदान केले.
विरोधकांच्या घोषणाबाजीत नॅशनल असेंब्लीचे सभापती सरदार अयाज सादिक यांनी हा निकाल जाहीर केला. शाहबाज शरीफ हे सोमवारी अध्यक्षीय प्रासादात पंतप्रधानपदाची शपथ घेतील.