

ढाका : जनआंदोलनामुळे सत्ता गमावावी लागल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून हद्दपारीचे जीवन जगत असलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी मायदेशी परतण्याच्या उद्देशाने सोमवारी नव्या पासपोर्टसाठी अर्ज केला आहे. बांगलादेश सरकार भारताकडून त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी करत आहे, तसेच त्यांना मायदेशी परतण्यासाठी नव्या ओळखपत्रांची आवश्यकता असल्याचा दावा यापूर्वी सरकारने फेटाळून लावला होता. मात्र, शेख हसीना यांनी दिलेल्या एका मुलाखतीत, आपण कोणत्याही परिस्थितीत डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतणार असल्याचे ठामपणे सांगितले होते.
भारताचा नकार
हसीना डिसेंबरपर्यंत बांगलादेशात परतण्यासाठी दृढनिश्चयी आहेत आणि त्या नक्कीच मायदेशी परततील. या घडामोडींवर बांगलादेश सरकारची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया त्वरित उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान, गुरुवारी परराष्ट्र राज्यमंत्री हुमायून कबीर यांनी सांगितले की, भारत आणि बांगलादेश यांच्यातील प्रत्यार्पण करारांतर्गत शेख हसीना यांना बांगलादेशच्या स्वाधीन केले जावे अशी सरकारची मागणी आहे. मात्र, भारताने हसीना यांना बांगलादेशकडे सोपवण्यास नकार दिला आहे.