शेख हसीना यांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना एका अवमान प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. बांगलादेशमधील क्राइम ट्रिब्युनलचे न्यायमूर्ती मोहम्मद गुलाम मुर्तुझा मोझुमदार यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने शेख हसीना यांना ही शिक्षा सुनावली आहे.
शेख हसीना यांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा
Published on

ढाका : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना एका अवमान प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. बांगलादेशमधील क्राइम ट्रिब्युनलचे न्यायमूर्ती मोहम्मद गुलाम मुर्तुझा मोझुमदार यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने शेख हसीना यांना ही शिक्षा सुनावली आहे. गैबांधामधील गोविंदगंजच्या रहिवासी शकील अकंद बुलबुल यांनाही याच प्रकरणात दोन महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बुलबुल या आवामी लीगच्या विद्यार्थी शाखेशी म्हणजेच बांगलादेश छात्र लीगशी संबंधित आहेत. हा अवमान खटला शकील अकंद बुलबुल यांच्याशी झालेल्या कथित फोनकॉलशी संबंधित आहे. या कथित कॉलमध्ये शेख हसीना नावाची व्यक्ती म्हणत होती की, माझ्याविरोधात २२७ खटले चालू आहेत. त्यामुळे मला २२७ जणांना ठार मारण्याचा परवाना मिळाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in