चीनच्या सहा युद्धनौका आखाती प्रदेशात तैनात

युद्धाचा आवाका वाढल्यास या प्रदेशातील चीनच्या मित्रदेशांना पाठिंबा देणे त्यामुळे शक्य होणार आहे.
चीनच्या सहा युद्धनौका आखाती प्रदेशात तैनात

बीजिंग : हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनने आखाती प्रदेशात सहा युद्धनौका तैनात केल्या आहेत. युद्धाचा आवाका वाढल्यास या प्रदेशातील चीनच्या मित्रदेशांना पाठिंबा देणे त्यामुळे शक्य होणार आहे.

चीनच्या ४४व्या नौदल ताफ्यातील युद्धनौकांनी नुकताच ओमानबरोबरील संयुक्त युद्ध कवायतींत सहभाग घेतला. तेथून त्यातील सहा युद्धनौका थेट युद्धक्षेत्राच्या दिशेने रवाना करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांचा नेमका ठावठिकाणा चीनने जाहीर केलेला नाही. त्यात झिबो नावाची क्षेपणास्त्रसज्ज विनाशिका, जिंगझाऊ ही फ्रिगेट आणि कियानदाओहू नावाची रसद पुरवठा नौका यांचा समावेश आहे.

अमेरिकेने यापूर्वीच यूएसएस जेराल्ड फोर्ड आणि यूएसएस ड्वाइट आयसेनहॉवर या दोन विमानवाहू युद्धनौकांचे ताफे भूमध्य समुद्रात इस्रायलजवळ तैनात केले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in