जखम भरली का, हे आता मशीन सांगणार; ऑस्ट्रेलियातील संशोधकांची कमाल

माणसाला विविध प्रकारच्या जखमा होत असतात. त्यामुळे डॉक्टर संबंधित रुग्णाला ड्रेसिंग करतात. जखम पुन्हा खुली करून ती भरली का, हे डॉक्टरांना सातत्याने पाहावे लागते. आता जखम भरण्यासाठी ती पुन्हा उघडण्याची गरज लागणार नाही. कारण जखम भरली की नाही याची माहिती एक छोटे मशीन देणार आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठे बदल होतील.
जखम भरली का, हे आता मशीन सांगणार; ऑस्ट्रेलियातील संशोधकांची कमाल
Published on

मेलबर्न : माणसाला विविध प्रकारच्या जखमा होत असतात. त्यामुळे डॉक्टर संबंधित रुग्णाला ड्रेसिंग करतात. जखम पुन्हा खुली करून ती भरली का, हे डॉक्टरांना सातत्याने पाहावे लागते. आता जखम भरण्यासाठी ती पुन्हा उघडण्याची गरज लागणार नाही. कारण जखम भरली की नाही याची माहिती एक छोटे मशीन देणार आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठे बदल होतील.

तंत्रज्ञानाने वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. पूर्वीच्या काळी गंभीर आजार कळतच नव्हते. आता नवनवीन मशीन्समुळे आजारांचा शोध घेणे व तपासणीच्या जोरावर डॉक्टर आजाराचे निदान अचूक करू शकतात. आता ऑस्ट्रेलियाच्या ‘आरएमआटी’ विद्यापीठाच्या संशोधकांनी खास छोटे मशीन तयार केले आहे. हे मशीन जखमेवर लावलेली पट्टी न उघडताच जखम भरलेले आहे की नाही हे सांगणार आहे. हे मशीन जखमेवर लक्ष ठेवेल. विशेष म्हणजे डॉक्टरच्या फीपेक्षाही कमी किमतीत हे यंत्र उपलब्ध आहे.

या मशीनचे प्रमुख संशोधक डॉ. पीटर फ्रान्सिस मॅथ्यू इलेंगो यांनी सांगितले की, हे मशीन माणसाची त्वचा व खांद्यावर सहजपणे लावले जाऊ शकते. जखमेवर लक्ष ठेवणे तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. आता या मशीनच्या क्लीनिकल चाचण्यांसाठी उद्योग-व्यवसायातील भागीदारांची गरज लागणार आहे, असे सांगण्यात आले.

या मशीनची किंमत किती?

सध्या बाजारात ‘स्मार्ट बँडेज’ व ‘बायोसेन्सर’ आले आहेत. ते एकदाच वापरले जातात. हे मशीन सातत्याने वापरले जाऊ शकते. याची किंमत ५ अमेरिकन डॉलर म्हणजे ४३६ रुपये असू शकते. सर्वसामान्य माणूस ते सहजपणे खरेदी करू शकतो.

हे मशीन कसे फायदेशीर ठरणार?

आपल्याला जखम झाल्यानंतर डॉक्टर त्यावर पट्टी लावतात. ती सतत बदलावी लागते. कारण जखम किती भरली आहे हे त्यातून कळते. यात जीवाणू जखमेत जातात. या सगळ्यातून वाचण्यासाठी हे मशीन बनवले आहे. या मशीनमध्ये ॲॅडव्हान्स सेन्सर बसवला आहे. तो पीच लेवल, तापमान व सूज आदींची माहिती देईल. या मशीनच्या मदतीने डॉक्टर रुग्णाला हात न लावता जखम किती भरली आहे हे सांगू शकतात. सध्या हे यंत्र प्राथमिक टप्प्यात असून नुकतीच त्याच्या प्रयोगशाळेत चाचण्या झाल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in