गंधज्ञान हरवलेल्यांना स्मेल ट्रेनिंग; वास घेण्याची क्षमता सुधारण्यावर ब्रिटिश शास्त्रज्ञांचे संशोधन

कोविड काळात अनेक जणांना वास कमी येण्याचा त्रास जाणवत होता. त्यावेळी ते कोविडची लागण झाल्याचे लक्षण समजले गेले.
गंधज्ञान हरवलेल्यांना स्मेल ट्रेनिंग; वास घेण्याची क्षमता सुधारण्यावर ब्रिटिश शास्त्रज्ञांचे संशोधन

एडिंबर्ग : कोविड काळात अनेक जणांना वास कमी येण्याचा त्रास जाणवत होता. त्यावेळी ते कोविडची लागण झाल्याचे लक्षण समजले गेले. मात्र, कोविड संपून आता चार वर्षे होत आली तरी ब्रिटनमधील दर पाचपैकी एका व्यक्तीला वास घेण्याची क्षमता कमी झाल्याचा त्रास जाणवत आहे. तसेच २० पैकी एका व्यक्तीला ॲनॉस्मिया, म्हणजे कोणताही वास अजिबात न येण्याचा त्रास होत आहे. ब्रिटनच्या एडिंबर्ग नेपियर विद्यापीठात झालेल्या नव्या संशोधनामुळे अशा व्यक्तींना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ब्रिटिश शास्त्रज्ञांनी या विषयावर केलेल्या संशोधनातून असे दिसून आले की, 'स्मेल ट्रेनिंग' तंत्रामुळे अनेक लोकांना वास घेण्याची क्षमता सुधारण्यात मदत मिळते. हे तंत्र फिजिओथेरपीप्रमाणेच कार्य करते. एखादी दुखापत झाल्यानंतर रुग्णांना फिजिओथेरपी देण्यात येते. त्यात रुग्णांच्या एखाद्या अवयवाला विशिष्ट प्रकारचा व्यायाम देण्यात येतो. दररोज व्यायामाची मात्रा वाढवण्यात येते. अनेक दिवस असे केल्यानंतर त्या अवयवाची कार्यक्षमता सुधारते. आपल्या गंधपेशीही तसाच प्रकारे काम करतात. त्यांना जर दररोज काही वास घेण्याचा सराव दिला तर कालांतराने त्यांची वास घेण्याची क्षमता वाढते. या प्रक्रियेत रुग्णाला दररोज काही सुगंधी द्रव्ये, तेले, औषधे आणि मसाल्यांचा वास देण्यात येतो. हळूहळू रुग्णाला त्याचा फायदा जाणवू लागतो. मानवी गंधपेशींमध्ये पुन्हा वाढ होण्याची नैसर्गिक क्षमता आहे. त्याचाही या उपाययोजनेत फायदा होतो.

मात्र, आजवरच्या संशोधनातून हेही दिसून आले आहे की, 'स्मेल ट्रेनिंग'चा फायदा खूप कमी लोकांना आणि मर्यादित स्वरूपात होतो. या उपाययोजनेला प्रयोगशाळेत चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी प्रत्यक्ष जीवनात रुग्णांना त्याचा म्हणावा तितका फायदा झालेला नाही. हे उपाय दीर्घकालीन असल्याने त्याचा संशोधनावरही परिणाम झालेला दिसला. 'स्मेल ट्रेनिंग'चे संशोधन सुरू केल्यापासून तीन महिन्यांनंतर प्रयोगात सहभागी झालेल्या १०० पैकी ८८ उमेदवारच शिल्लक राहिले होते. सहा महिन्यांनंतर हे प्रमाण ५६

क्रॉस-मोडल असोसिएशन्सचा फायदा

'स्मेल ट्रेनिंग'ने होणाऱ्या मर्यादित फायद्याची व्याप्ती वाढवण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक अभिनव पद्धत वापरली. तिला 'क्रॉस-मोडल असोसिएशन्स' म्हणतात. या प्रकारात व्यक्तीचे गंधज्ञान सुधारण्यासाठी रंगज्ञान, आकारांचे ज्ञान, स्पर्श, आवाज, तापमान अशा अन्य संवेदनांचा वापर केला जातो. आपली वास घेण्याची क्षमता अन्य संवेदनांशी जोडलेली असते. लाल किंवा भडक रंग उष्ण तापमानाशी आणि कर्कश आवाजाशी संबंधित असतात. गोलाकार मऊपणाशी आणि टोकदार आकार खरखरीतपणाशी संबंधित असतो. तसेच काही रंग, आकार विशिष्ट गंधाशी संबंधित असतात. त्या रंग, आकार, आवाजावरून वेगवेगळे वास घेण्याची क्षमता सुधारता येते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in