सुनिता विल्यम्सने काही दिवसांपूर्वी साधला होता विद्यार्थ्यांसोबत संवाद म्हणाली, चालतात कसे...

''मी अंतरिक्षात खूप काळापासून आहे. त्यामुळे मी आता चालतात कसे हे विसरले आहे'', असे भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम्स हिने काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांसोबतच्या संवादात सांगितले. आठ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये (ISS) अडकलेल्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बूच विल्मोर दोघे आता पृथ्वीवर परतणार आहेत.
सुनिता विल्यम्सने काही दिवसांपूर्वी साधला होता विद्यार्थ्यांसोबत संवाद म्हणाली, चालतात कसे...
सुनिता विल्यम्सने काही दिवसांपूर्वी साधला होता विद्यार्थ्यांसोबत संवाद म्हणाली, चालतात कसे...
Published on

''मी अंतरिक्षात खूप काळापासून आहे. त्यामुळे मी आता चालतात कसे हे विसरले आहे'', असे भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम्स हिने काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांसोबतच्या संवादात सांगितले. आठ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये (ISS) अडकलेल्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बूच विल्मोर दोघे आता पृथ्वीवर परतणार आहेत. नासाने त्यांचे वेळापत्रक बदलून या अंतराळवीरांना पुन्हा पृथ्वीवर आणण्यासाठी खास योजना आखली आहे.

नासाने याविषयी माहिती दिली आहे. नासाने म्हटले आहे की, सुनिता आणि बूच दोघांना परत आणण्यासाठी मूळ नियोजित वाहनाऐवजी स्पेसएक्स क्रू ड्रॅगन कॅप्सूलने परत आणण्यात येईल. यापूर्वी क्रू -९ या यानाने दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्याची योजना होती. मात्री क्रू ९ मध्ये तांत्रिक त्रूटी असल्या कारणाने हे यान रिकामे पृथ्वीवर आणले जाणार आहे. नासाच्या क्रू-१० मोहिमेअंतर्गत सुनिता आणि बूच दोघांनाही परत आणण्याची योजना आहे. क्रू-१० हे १२ मार्च रोजी प्रक्षेपित केले जाईल.

नासाने आपल्या सोशल मीडिया पोस्टवर याविषयी म्हटले आहे, ''नासा आणि स्पेस एक्स आंतराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आणि तेथून येणाऱ्या क्रू रोटेशन मोहिमांसाठी यान प्रक्षेपणाचे लक्ष्य आणि परतीच्या तारखा जलद करणार आहेत. नवीन क्रू १० हे १२ मार्च रोजी प्रक्षेपित करण्याचे लक्ष्य आहे.''

'जागरण'च्या माहितीनुसार, सुनिता विल्यम्सने काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एका हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला होता. यावेळी इतके दिवस आंतराळ स्थानकात राहताना कसे वाटत आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणाली, ''मी खूप काळापासून अंतराळात आहे. त्यामुळे मला आता आठवावे लागेल चालतात कसे? मी अंतराळ स्थानकात आल्यापासून चाललेली नाही. तसेच मी खाली देखील बसले नाही इतकेच काय तर मी झोपलेली देखील नाही. असेही इथे अंतराळस्थानकात याची गरजही पडत नाही. इथे फक्त तुम्ही डोळे बंद करा आणि तरंगत राहा.''

जून २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाण्यासाठी केले होते उड्डाण

अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बूच विल्मोर दोघेही जून २०२४ मध्ये दोघेही बोइंगच्या नवीन स्टारलाइनर कॅप्सूल (यान)ची चाचणी घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले होते. हे दोघे मोजक्या काही दिवसांसाठी तिथे राहणार होते. मात्र स्टारलाइनरमध्ये बिघाड झाल्याने ते पुन्हा अंतरिक्षातच थांबले. तेव्हापासून जवळपास आता ८ महिने होत आले आहेत. दोन्ही अंतराळवीर अंतरिक्षातच अडकले आहेत.

आता अखेर दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. त्यांचे कुटुंबीय आणि चाहते त्यांच्या परतीची आतुरतेने वाट पाहत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in