दावोस : भारत २०२८ पूर्वी पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनू शकेल आणि देशाच्या मोठ्या लोकसंख्येच्या हिताचे रक्षण करण्यासाठी देशाचे ऊर्जा संक्रमण सुव्यवस्थितपणे करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मंगळवारी प्रतिपादन केले.
जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीच्या पार्श्वभूमीवर 'शाश्वत आर्थिक विकासाकडे भारताच्या ऊर्जा संक्रमणाला गती देणे' या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. ते म्हणाले की भारताला शाश्वततेच्या उद्दिष्टांप्रती असलेल्या वचनबद्धतेची जाणीव आहे आणि वाढत्या अर्थव्यवस्थेच्या गरजा पूर्ण करताना सर्व लक्ष्य वेळेत पूर्ण करेल. मला वाटत नाही की आम्हाला पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्यासाठी २०२९ पर्यंत वाट पाहण्याची गरज आहे आणि आपण काय घडत आहे ते पाहिल्यास ते २०२८ च्या आधी घडले पाहिजे, असे विविध मॅक्रो इकॉनॉमिक पॅरामीटर्सचा संदर्भ घेत त्यांनी सांगितले.