स्वीडनच्या 'नाटो'प्रवेशाचा मार्ग मोकळा, हंगेरीची मान्यता

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युरोपमधील नॉर्वे आणि स्वीडन हे बरीच दशके तटस्थ असलेले देशही 'नाटो'त सामील होऊ लागले आहेत.
स्वीडनच्या 'नाटो'प्रवेशाचा मार्ग मोकळा, हंगेरीची मान्यता

बुडापेस्ट : अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (नाटो) या लष्करी संघटनेत स्वीडनच्या प्रवेशास हंगेरीच्या संसदेने मंगळवारी मान्यता दिली आहे. त्यामुळे स्वीडनच्या 'नाटो'प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युरोपमधील नॉर्वे आणि स्वीडन हे बरीच दशके तटस्थ असलेले देशही 'नाटो'त सामील होऊ लागले आहेत. 'नाटो'त सध्या ३१ सदस्य देश आहेत. संघटनेत नवीन देशाला प्रवेश देण्यासाठी त्याला सर्व सदस्यांनी मान्यता देणे गरजेचे असते. अन्य ३० देशांनी स्वीडनच्या प्रवेशास यापूर्वीच मान्यता दिली होती. केवळ हंगेरीची मान्यता मिळणे बाकी होते. मंगळवारी हंगेरीच्या संसदेत त्यासाठी मतदान घेण्यात आले. हंगेरीच्या एकूण १९९ खासदारांपैकी १९४ खासदारांनी मतदानात भाग घेतला. त्यापैकी १८८ खासदारांनी स्वीडनच्या 'नाटो'प्रवेशाच्या बाजूने मतदान केले. तर सहा खासदारांनी विरोधात मतदान केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in