अफगाणिस्तानात महिलांचे काम बंद; तालिबानचा नवा फतवा

अफगाणिस्तानात तीन वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या तालिबानने स्त्रियांचे जगणे हराम केले आहे. त्यांच्यावर अनेक अटी लादून आधी त्यांचे हिंडणे-फिरणे बंद केले.
अफगाणिस्तानात महिलांचे काम बंद; तालिबानचा नवा फतवा
एक्स @petersanyaone
Published on

काबूल : अफगाणिस्तानात तीन वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या तालिबानने स्त्रियांचे जगणे हराम केले आहे. त्यांच्यावर अनेक अटी लादून आधी त्यांचे हिंडणे-फिरणे बंद केले. आता तर महिलांच्या कामावरच बंदी आणण्याचा निर्णय तालिबानने घेतला आहे. महिलांना कामावर ठेवणाऱ्या सर्व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गैरसरकारी संस्था बंद करू, असा इशारा तालिबानने दिला आहे.

तालिबानच्या अर्थ खात्याने रविवारी सांगितले की, जे ‘एनजीओ’ सरकारच्या आदेशाचे पालन करणार नाहीत. त्यांना अफगाणिस्तानात काम करण्याचा परवाना गमवावा लागेल.

घरात खिडक्या नको!

घरात खिडक्याही लावू नका, असे आदेश तालिबानने दिले आहेत. तसेच ज्या घरांना खिडक्या असतील, त्यांनी त्या बंद कराव्यात, असे तालिबानने म्हटले आहे. या नवीन नियमामुळे स्वयंसेवी संस्थांच्या कामावर नियंत्रण ठेवण्याचा किंवा त्यांच्या कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न आहे.

तालिबान सरकारने यापूर्वीच महिलांना नोकरी किंवा सार्वजनिक ठिकाणाहून प्रतिबंधित केले आहे. तसेच सहावीच्या पुढे शिक्षण घेण्यासही बंदी घातली आहे.

तालिबानचे नेते हिबतुल्लाह अखुंदजादा यांनी आदेश दिले की, ज्या ठिकाणी महिला उभी राहू शकेल, अशा इमारतींना खिडक्या ठेवू नयेत. हा नियम नवीन इमारतींसोबतच जुन्या इमारतींना लागू असेल.

logo
marathi.freepressjournal.in