तालिबानने पुकारलं पाकिस्तानविरोधात युद्ध ; अनेक गावांवर ताबा केल्याचा दावा

तालिबानने पुकारलं पाकिस्तानविरोधात युद्ध ; अनेक गावांवर ताबा केल्याचा दावा

अफगाणिस्तानच्या सीमेलगत तोरखम बॉर्डर टर्मिनलवर पाकिस्तानी सैन्य आणि TTP यांच्यात भीषण गोळीबारी सुरु आहे.

तालिबानला मोठं करणं आता पाकिस्तानच्याच अंगलट आलं आहे. तरहीक ए तालिबान पाकिस्तान म्हणजे TTP ने पाकिस्तानविरोधातच युद्ध पुकारले आहे. अफगाणिस्तानच्या सीमेलगत तोरखम बॉर्डर टर्मिनलवर पाकिस्तानी सैन्य आणि TTP यांच्यात भीषण गोळीबारी सुरु आहे. आतापर्यंत पाकिस्तानच्या ४ जवानांचा यात मृत्यू झाला आहे. तर अनेक पाकिस्तानी सैनिकांना बंदिस्त केल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने तोरखम बॉर्डरवरील वाहतूक सील केली आहे.

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात चित्राल जिल्हाय TTPने पाकिस्तानी सैन्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. तहरीक-ए तालिबान म्हणजे TTP चे कमांडर यांनी अफगाणिस्तान मीडियाला सांगितलं की, आम्ही पाकिस्तानच्या अनेक गावांवर कब्जा केला आहे. कब्जा केलेल्या गावांवर इंटरनेट खराब आहे. इंटरनेट आल्यावर या गावांचे फोटो, व्हिडिओ जाहीर केले जातील असं देखील त्यांनी सांगितलं.

पाकिस्तानने मात्र डूरंड लाईनवर TTP विरोधात गोळीबार झाल्याचं सांगितलं आहे. मात्र गावांवार ताबा केल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे. TTP ने पाकिस्तानच्या कुठल्याही गावांवर कब्जा केला नसल्याचं पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. तर TTPच्या प्रवक्ता मुहम्मद खुरासानी यांनी एक निवेदन जारी करत बॉर्डर क्षत्रात राहणाऱ्या लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे. आमची लढाई पाकिस्तान सरकारशी आणि त्यांच्या सुरक्षा यंत्रणांशी असून सामान्य नागरिकांना कुठलेही नुकसान होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

TTP ने नोव्हेंबर २०२२ मध्ये पाकिस्तानी सैन्याविरोधात युद्ध पुकारले. पाकिस्ानी सैन्याला हरवून तिथल्या सरकारची सत्ता उखडून टाकून त्याठिकाणी तहरीक ए तालिबान शरिया कायद्याचं पालन करणारे सरकार बनवेल. या मिशनला पूर्ण करण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून TTPने पाकिस्तानात मोठमोठ हल्ले केले आहेत, असं TTP ने सांगितलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in