तारिक रेहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ

बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून मंगळवारी ‘बीएनपी’चे नेते तारिक रेहमान यांनी पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी रेहमान यांना शपथ दिली.
तारिक रेहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ
Published on

ढाका : बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून मंगळवारी ‘बीएनपी’चे नेते तारिक रेहमान यांनी पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी रेहमान यांना शपथ दिली.

माजी पंतप्रधान शेख हसीना यांची राजवट उलथून टाकण्यात आल्यानंतर बांगलादेशात मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार कारभार पाहात होते. रेहमान हे माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया आणि झिया-ऊर-रेहमान यांचे पुत्र आहेत.

त्यापूर्वी रेहमान यांची ‘बीएनपी’ संसदीय पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली. बांगलादेशच्या अध्यक्षांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांनाही शपथ दिली. या शपथविधीला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.

शपथविधीनंतर रेहमान यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रीय ऐक्य आणि शांततेचे आवाहन केले. देशाची अर्थव्यवस्था नाजुक स्थितीत आहे, महत्त्वाच्या संस्था दुर्बल झाल्या आहेत आणि कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. आपल्यात मतभेद असले तरी देशहितासाठ ऐक्य अबाधित ठेवले पाहिजे, राष्ट्रीय ऐक्य हे सामूहिक सामर्थ्य आहे, असे रेहमान म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in