तेजस्वी यादव यांनी घेतली दलाई लामांची भेट

पर्यटन विभागाने येथे भाविकांसाठी ध्यानधारणा करण्यासाठी व्यापक व्यवस्था केली आहे. राज्य सरकारने बोधगया येथे पंचतारांकित हॉटेलला आधीच मान्यता दिली आहे.
तेजस्वी यादव यांनी घेतली दलाई लामांची भेट

गया : तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांची बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी गुरुवारी बोधगया येथे भेट घेतली. गेल्या दोन आठवड्यांपासून बोधगयामध्ये दलाई लामा आहेत.

तिबेटी मठात यादव यांनी लामांची भेट घेतली. बैठकीनंतर ते महाबोधी मंदिरात गेले आणि तेथे त्यांनी प्रार्थना केली. आपल्या भेटीसंबंधात तेजस्वी यादव म्हणाले की, मी आज दलाई लामा यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. मंदिरातील भाविकांसाठी केलेल्या व्यवस्थेचीही पाहणी केली. महाबोधी मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निर्देशानुसार, राज्याच्या पर्यटन विभागाकडून केले जात आहे. भाविकांची संख्या वाढत असल्याने आणखी काय करता येईल हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत

पर्यटन विभागाने येथे भाविकांसाठी ध्यानधारणा करण्यासाठी व्यापक व्यवस्था केली आहे. राज्य सरकारने बोधगया येथे पंचतारांकित हॉटेलला आधीच मान्यता दिली आहे. मी त्या जागेची पाहणी करेन," असे यादव म्हणाले. या आधी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी २१ डिसेंबर रोजी बोधगया येथे दलाई लामा यांची भेट घेतली होती.

logo
marathi.freepressjournal.in