पाकिस्तानमध्ये वाहनांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; ५० ठार, २० जखमी

पाकिस्तानमध्ये पेशावर येथे जात असलेल्या प्रवासी वाहनांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात गुरुवारी किमान ५० जण ठार झाले, तर अन्य २० जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाकिस्तानमध्ये वाहनांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; ५० ठार, २० जखमी
Published on

पेशावर : पाकिस्तानमध्ये पेशावर येथे जात असलेल्या प्रवासी वाहनांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात गुरुवारी किमान ५० जण ठार झाले, तर अन्य २० जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

खैबर पख्तुन्वा प्रांतातील अफगाणिस्तानच्या सीमेवरील खुर्रम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी प्रवासी वाहनांना लक्ष्य केले. पारचिनार येथून पेशावर येथे वाहनांचा ताफा जात असताना हा हल्ला करण्यात आला. त्यामध्ये आठ महिला, पाच मुले आणि अन्य २० जण ठार झाले. ठार झालेल्यांमध्ये बहुसंख्य लोक शिया समाजातील होते. तालिबानचे प्राबल्य असलेल्या परिसरामध्ये वाहनांवर हल्ले केले जातात. ताफ्यात जवळपास २०० वाहने होती.

खैबर पख्तुन्वाचे मुख्यमंत्री अली अमिन खान यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून एका शिष्टमंडळाला तातडीने खुर्रम जिल्ह्यात पाठविले आहे आणि त्यांना स्थितीबाबतचा अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या प्रांतातील सर्व रस्त्यांच्या सुरक्षेसाठी प्रांतिक महामार्ग पोलीस पथक स्थापन करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in