सोमालियाच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला; चार ठार: अल-कैदाशी संबंधित अतिरेकी गट अल-शबाबचा दावा

शनिवारी झालेल्या हल्ल्यात मोगादिशू येथील जनरल गॉर्डन मिलिटरी बेसवरील सैनिकांना लक्ष्य करण्यात आले.
सोमालियाच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला; चार ठार: अल-कैदाशी संबंधित अतिरेकी गट अल-शबाबचा दावा

दुबई : मोगादिशू या सोमालियाच्या राजधानीतील लष्करी तळावर चालू असलेल्या एका प्रशिक्षण मोहिमेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अमिराती सैन्यातील तीन सैनिक आणि एक बहरिनचा लष्करी अधिकारी ठार झाला असल्याचा दावा अल-कायदाशी संबंधित अतिरेकी गट अल-शबाबने केला आहे.

शनिवारी झालेल्या हल्ल्यात मोगादिशू येथील जनरल गॉर्डन मिलिटरी बेसवरील सैनिकांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्याबद्दल आणि त्यात इतरांचा मृत्यू झाला की नाही, याबद्दलचे तपशील मात्र उपलब्ध होऊ शकले नाहीत. सोमालियाचे अध्यक्ष हसन शेख मोहमुद यांनी यूएईला या सैनिकांच्या मृत्यूंबद्दल शोक व्यक्त केला आहे.

एक्सवर त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की, दहशतवाद्याच्या कोणत्याही प्रकारच्या कृत्यात आम्ही मुकाबला करीत राहू, अशा प्रकारच्या हल्ल्यांपासून आम्हाला आमच्या दहशतवादविरोधात सुरक्षारक्षणाच्या कामात कोणीही रोखू शकणार नाही. अल-शबाब किंवा अरबी भाषेत ‘युवा’ या अर्थाने प्रचलित असणारा हा सोमालियातील एक सुन्नी इस्लामिक अतिरेकी गट आहे जो १९९१ च्या गृहयुद्धानंतर त्या देशातील अनेक वर्षांच्या अराजकतेतून जन्माला आला आहे. अल-कायदाच्या संलग्न संघटनेने एकेकाळी मोगादिशू ताब्यात घेतले होते. कालांतराने, अमेरिका आणि इतर देशांच्या पाठिंब्याने आफ्रिकन युनियनच्या नेतृत्वाखालील सैन्याने अतिरेक्यांना मोगादिशूमधून बाहेर ढकलले. त्यानंतरच्या वर्षांमध्ये, अल-शबाब हा एक धोका राहिला आहे. कारण तो पाश्चात्य-समर्थित सोमाली सरकार उलथून टाकू इच्छित आहे. अल-शबाबने शेजारच्या केनियामध्येही हल्ले केले आहेत. वॉशिंग्टन आधारित सुरक्षा थिंक टँक न्यू अमेरिकाच्या मते, हल्ल्यांची संख्या आता ३०० पेक्षा जास्त आहे. यातील बहुतांश हल्ले तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात झाले.

logo
marathi.freepressjournal.in