टेस्ला लवकरच भारतात येणार ; पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर मस्क यांचे संकेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना त्यांनी स्वत:हून मोदींची भेट घेण्याची इच्छा व्यक्त करत ही भेट घेतली
टेस्ला लवकरच भारतात येणार ; पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर मस्क यांचे संकेत

जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार निर्माती कंपनी टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी भारतात गुंतवणूक करण्याची मनीषा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नव्याने बोलून दाखवली आहे. अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मस्क यांनी न्यूयॉर्कमधील पॅलेस हॉटेलमध्ये मंगळवारी भेट घेतली.

एलॉन मस्क यांनी यापूर्वीही भारतात आपल्या कंपनीचा विस्तार करण्याचे सुतोवाच केले होते. मात्र, त्यावेळी सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांनी बोलून दाखवले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना त्यांनी स्वत:हून मोदींची भेट घेण्याची इच्छा व्यक्त करत ही भेट घेतली. या भेटीनंतर मस्क म्हणाले, ‘‘कंपनी नजीकच्या काळात भारतात गुंतवणूक करणार आहे. भारताच्या विकासासाठी ती महत्त्वाची ठरेल. मी स्वत: पुढील वर्षी भारतभेटीवर येणार आहे आणि टेस्लाही भारतात पाऊल ठेवेल, असा विश्वास आहे. पंतप्रधानांनीही मला भारतात येण्यास पाठिंबा दिला आहे. नजीकच्या काळात आम्ही भारताच्या विकासाच्या दृष्टीने योजना जाहीर करू. भारतासोबत असलेल्या आमच्या संबंधांच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची गुंतवणूक असेल.”

मी मोदींचा चाहता

एलॉन मस्क यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. ‘‘त्यांना भारताची काळजी आहे. ते आम्हाला भारतात महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. मी मोदींचा चाहता आहे.” असे मस्क यांनी ट्विट केले आहे. “आज तुमच्यासोबतची भेट खूप छान होती. तुम्हाला पुन्हा भेटणे ही खूप सन्मानाची गोष्ट आहे,” असेही मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

टेस्लाच्या समभागांनी घेतली उसळी

एलॉन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची न्यूयॉर्कमधील पॅलेस हॉटेलमध्ये झालेली बैठक आणि मस्क यांनी भारतात गुंतवणुकीची केलेली घोषणा यांचा कंपनीच्या शेअर्सवर परिणाम झाला आहे. टेस्ला इंकचे शेअर्स ५.३४ टक्क्यांच्या उसळीसह बंद झाले. टेस्ला शेअर्समधील या मजबूत वाढीमुळे, एलॉन मस्क यांची नेट वर्थ ९.९५ बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजे एका दिवसात सुमारे ८१ हजार कोटी रुपयांनी वाढून २४३ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in