पाणबुडीवरून आंतरखंडिय क्षेपणास्त्राची चाचणी रशियाच्या शस्त्रागारात आणखी एक भर

चाचणी केलेल्या क्षेपणास्त्राची अण्वस्त्रासह तब्बल आठ हजार किमी अंतरापर्यंत मारा करण्याची क्षमता आहे.
पाणबुडीवरून आंतरखंडिय क्षेपणास्त्राची चाचणी 
रशियाच्या शस्त्रागारात आणखी एक भर
Published on

मॉस्को : आपली लष्करी ताकद जगाला दाखवण्याच्या प्रयत्नात रशियाने आणखी एक यशस्वी प्रयोग करताना बुलावा क्षेपणास्त्र गटातील नव्या क्षेपणास्त्राची चाचणी नुकतीच केली. रशियाने ही चाचणी आपल्या नव्या कोऱ्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या इंपरेटर अलेक्झांडर-३ पाणबुडीवरून केली आहे. चाचणी केलेल्या क्षेपणास्त्राची अण्वस्त्रासह तब्बल आठ हजार किमी अंतरापर्यंत मारा करण्याची क्षमता आहे.

रशियाने नुकतीच अण्वस्त्र बंदी करारातून माघार घेतल्यामुळे रशियाकडून अणुहल्ला होण्याची भीती वाढली असतानाच रशियाने या घातक अण्वस्त्र सज्ज क्षेपणास्त्राची पाणबुडीवरून चाचणी केली आहे. रशियाने ही चाचणी श्वेत समुद्रातील एका अज्ञात स्थळावरून केली असून क्षेपणास्त्राने रशियाच्या अतिपूर्वेकडील कमचात्का द्वीपखंडाजवळील लक्ष्य अचूकपणे भेदले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लॅदिमीर पुतीन रशियाला धोका निर्माण होत असल्यामुळे आपला अण्वस्त्र शक्तीचा दरारा सातत्याने करीत आहेत. इंपरेटर अलेक्झांडर-३ पाणबुडी १६ बुलावा क्षेपणास्त्रे आणि अत्याधुनिक पाणतीर (टॉर्पेडो) सज्ज करण्यात आली आहे.

रशियाच्या नौदलाची अण्वस्त्र सज्जता

रशियाकडे आजमितीस बोरेर्इ गटातील तीन अण्वस्त्रसज्ज पाणबुड्या आहेत. त्यापैकी एकावर अण्वस्त्रांची चाचणी सुरू असून आणखी तीन नव्या पाणबुड्यांचे बांधकाम सुरू आहे. तसेच बुलावा क्षेपणास्त्र सहा अणुबॉम्ब घेऊन आठ हजार किमी अंतरापर्यंत मारा करू शकते. यामुळे रशियाचा नौदल आरमारात दबदबा निर्माण झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in