थायलंडमध्ये सहलीसाठी निघालेल्या शाळेच्या बसला भीषण आग; २५ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू

या बसमध्ये पाच शिक्षकांसह एकूण ४४ विद्यार्थी होते. पोलिसांनी अद्याप मृतांचा निश्चित आकडा दिलेला नाही. १६ विद्यार्थी आणि तीन शिक्षकांना आतापर्यंत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
थायलंडमध्ये शाळेच्या बसला आग; २५ विद्यार्थ्यांचा मृत्यू
थायलंडमध्ये शाळेच्या बसला आग; २५ विद्यार्थ्यांचा मृत्यू@justinbroadcast
Published on

बँकॉक : थायलंडमध्ये शाळेच्या एका बसला लागलेल्या आगीत २५ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या बसमध्ये पाच शिक्षकांसह एकूण ४४ विद्यार्थी होते.

बँकॉकमधील उथाई थानी येथील एका शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक या बसमधून सहलीसाठी जात होते. शाळेपासून २५० किमी अंतरावरील राजधानी बँकॉकमध्ये ही सहल जात होती. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ बचावकार्य हाती घेण्यात आले. मात्र, पोलिसांनी अद्याप मृतांचा निश्चित आकडा दिलेला नाही. १६ विद्यार्थी आणि तीन शिक्षकांना आतापर्यंत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बसला लागलेल्या आगीत २५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. एएफपीनुसार, बसमध्ये एकूण ४४ जण होते. त्यापैकी १६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या बचाव कर्मचारी उर्वरित मुलांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, बसचे टायर फुटल्याने आग लागल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in