इंग्लंडच्या पंतप्रधानपदी लागणार ऋषी सुनकची वर्णी?

ऋषी सुनक हे इन्फोसिस चे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई असून ते जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात अर्थखाते सांभाळायचे.
इंग्लंडच्या पंतप्रधानपदी लागणार ऋषी सुनकची वर्णी?

इंग्लंडचे पंतप्रधान बोरिन जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर नवीन पंतप्रधान कोण होणार याची चर्चा सुरु आहे. नव्या पंतप्रधान यादीत ६ नावे आहेत ज्यापैकी एक नाव म्हणजे भारतीय असलेले ऋषी सुनक. ऋषी सुनक हे इन्फोसिस चे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई असून ते जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात अर्थखाते सांभाळायचे. दोन दिवसापूर्वीच त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला आहे.

बोरिस यांच्या निवडणूक प्रचारामध्ये ऋषींची महत्वाची भूमिका होती. सरकारचा चेहरा म्हणून अनेकदा ते प्रेस ब्रिफींगमध्ये समोर यायचे. तसेच बऱ्याचदा टीव्ही वरील चर्चेत बोरिस यांच्या ऐवजी ऋषींचा प्रश्नांची उत्तरे द्यायचे त्यामुळे विरोधी पक्षाने अनेकदा नेमका पंतप्रधान कोण अशी टीका केली होती.

ऋषी सुनक यांनी कोरोना काळात देशाला (इंग्लंड)आर्थिक संकटातून वाचवले होते. २०२२ मध्ये हॉटेल इंडस्ट्रीजला इट आऊट टू हेल्प या योजनेखाली सव्वा पंधरा हजार कोटींची मदत देखील केली होती तर देशामधील पर्यटन व्यवसायाला उभारी मिळावी म्हणून १० हजार कोटीचे पॅकेज दिले. त्यामुळे आता पंतप्रधान पदाची जागा सांभाळायची संधी जर ऋषी सुनक यांना मिळाली तर हा नक्कीच एक ऐतिहासिक क्षण असेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in