देशांच्या अर्थव्यवस्था २०२४ पर्यंत रुळावर येतील; गीता गोपीनाथ

देशांच्या अर्थव्यवस्था २०२४ पर्यंत रुळावर येतील; गीता गोपीनाथ

विकसित देशांच्या अर्थव्यवस्था २०२४ पर्यंत रुळावर येतील, असे भाकीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रथम उप एमडी गीता गोपीनाथ यांनी वर्तवले आहे. तर विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्था त्यांच्या लक्ष्यापासून ५ टक्के मागे राहतील, असे त्या म्हणाल्या.

त्या म्हणाल्या की, कोरोनामुळे जगातील सर्व अर्थव्यवस्थांवर वाईट परिणाम झाला आहे. आता हळूहळू त्या पटरीवर येत आहेत. मात्र, युक्रेन युद्धाने त्याला मोठा झटका बसला आहे.जागतिक विकास दरात मोठी घट होण्याचा सामना करावा लागत आहे. जगाला सतत विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. इंधन व अन्नधान्याच्या किंमती सतत वाढत आहेत. जगभरातील केंद्रीय बँक महागाईचा मुकाबला करत आहेत. त्यामुळे त्यांना व्याजदरात वाढ करावी लागत आहे. मात्र, त्याचा जगाच्या आर्थिक वित्त व व्यापाऱ्यावर मोठा परिणाम होणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in