
हाँनकाँगमध्ये जन्मलेली गायिका आणि गितकार कोको ली ने आत्महत्या करुन आपलं आयुष्य संपवलं आहे. तीने वयाच्या ४८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ली इच्या मोठी बहिण कॅरोल आमि नॅन्सी ली यांनी बुधवारी इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत निवेदन दिले. यात त्या म्हणाल्या की, गेल्या काही महिन्यापासून तिची प्रकृती खूपच खालावली होती. कोकोने नैराश्यावर मात करण्याचा पुर्ण प्रयत्न केला. पण त्यात तिला अपयश आलं. कोको ली ने मागच्या आठवड्याच्या शेवटी घरी आत्महत्येचा प्रयत्न केला.
कोको ली ने आत्महत्येचा पर्यत्न केल्यानंतर तिला तातडीन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हापासून ती कोमात होती. अखेर बुधवारी कोको ली ची प्राणज्योत मालावली. याबाबती माहिती गायीकेच्या बहिणीने दिली आहे. हाँगकाँगमध्ये कोको लीचा जन्म झाला. ली नंतर यूएसला गेली. त्या ठिकाणी तिने सॅन फ्रॉन्सिस्कोमधील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत शिक्षण घेतलं. हाँगकाँगमध्ये प्रसारक tvB द्वारे आयोजित करण्यात आलेल्या गायन स्पर्धेत प्रथम उपविजता झाल्यानंतर ली गायिका बनली. यानंतर १९९४ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी तिचा पहिला अलबम रिलीज झाला.
कोको ली ने सुरुवातीला मँडोपॉप गायिका म्हणून सुरुवात केली असली तरी तिने तिच्या ३० वर्षाच्या कारकिर्दीत कँटोनीज आणि इंग्रजीमध्ये अल्बम रिलीज केले. कोको ली तिच्या लाईव्ह परफार्मन्ससाठी तसंच दमदार आवाजासाठी प्रसिद्ध होती. कोको ही अमेरीकन मार्केटमध्ये प्रवेश करणारी पहिली चीनी गायिका होती. ली चे इंग्रजी गाणं "डू यू वॉन्ट माय लव्ह" डिसेंबर १९९९ मध्ये बिलबोर्डच्या हॉट डान्स ब्रेकआउट्स चार्टवर #4 वर आलं. लीने २०११ साली ब्रूस रॉकोविट्झ या कॅनडियन उद्योगपतीशी लग्न केलं होतं. तिला रॉकोविट्झ लग्नानंतर दोन सावत्र मुली होत्या.