गाझातील बळींची संख्या २६ हजारांवर

गाझातील बळींची संख्या २६ हजारांवर

या युद्धात १२०० इस्त्रायलींची मृत्यू झाला असून २५० जणांना ओलीस ठेवले आहे.

जेरुसलेम : इस्त्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून तेथील मृत्यू २६ हजारांच्या पुढे गेल्याचे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले. त्यामुळे इस्रायलला गाझामधील आक्रमण थांबवण्याचा आदेश द्यायचा की नाही यावर आंतरराष्ट्रीय न्यायालय शुक्रवारी आपला निर्णय देणार होते. दक्षिण आफ्रिकेने इस्रायलवर नरसंहाराचा आरोप केला आणि नेदरलँड्समधील हेग येथील न्यायालयाला अंतरिम आदेश मागितले. मात्र, इस्त्रायलने ही मागणी फेटाळून लावली आहे. या युद्धात आतापर्यंत ६४४०० जण जखमी झाले आहेत. ७ ऑक्टोबरपासून गाझा व इस्त्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात १२०० इस्त्रायलींची मृत्यू झाला असून २५० जणांना ओलीस ठेवले आहे. इस्त्रालयने गुरुवारी केलेल्या हल्ल्यात २० जणांचा मृत्यू झाला असून १५० जण जखमी झाले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in