हवेतच उघडला विमानाचा दरवाजा; अनेकजण गुदमरले

लॅंडिंगच्या काही वेळ अगोदर विमान हवेत असते त्यावेळी आपत्कालीन एक्झिट उघडल्याचा प्रकार घडला आहे
हवेतच उघडला विमानाचा दरवाजा; अनेकजण गुदमरले

विमान जमिनीपासून काही अंतर वर असतानाच एका विमानाचा दरवाजा उघडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लॅंडिंगच्या काही वेळ अगोदर विमान हवेत असते त्यावेळी आपत्कालीन एक्झिट उघडल्याचा प्रकार घडला आहे. हवेतच हा दरवाजा उघडल्याने काही प्रवासी हे गुदमरुन गेल्याची बातमी समोर आली आहे.

दक्षिण कोरियाच्या योनहाप न्यूज एजन्सीने 9 जणांना रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले जात आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत विमान हवेत असताना उघड्या दारामधून वारा वाहताना दिसून येतोय. ज्यात फॅब्रिक सीट-बॅक आणि प्रवाशांचे केस वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यावर फडफडत आहेत. यावेळी प्रवासी गोंधळून गेल्याचे देखील दिसत आहे. तसेत या व्हिडिओ प्रवासी आरडाओरड करताना दिसत आहेत. अचानकपणे विमानाचा दरवाजा उघडल्याने विमानातील प्रवाशांचा श्वास गुदमरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एअरबस A321-200 हे 200 प्रवाशांना घेऊन जात होते. हे विमान डेगू आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर जमिनीपासून सुमारे 200 मीटर उंचीवर असताना हा प्रकार घडला आहे. एका प्रवाशाने आपात्कालीन दरवाजा उघडल्याने हा प्रकार घडला आहे. या प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याने दरवाजा का उघडला याबाबत त्यांची चौकशी सुरु असल्याचे एशियना एअरलाईन्सकडून सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in