
पृथ्वीवरचे तापमान सतत वाढत आहे. त्यामुळे नागरिकांचे जिणे मुश्कील झाले आहे. पाकिस्तानातील जैककाबाद येथे शनिवारी ५१ अंश तापमान नोंदवले गेले. हा जगातील तापमानाचा सर्वात मोठा विक्रम आहे.
जैककाबाद येथे सूर्य आग ओकत असून रस्त्यावर फिरण्यास लोक घाबरत आहेत. तेथे जगात सर्वाधिक ५१ अंश तापमानाची नोंद झाली. २०२२मध्ये आतापर्यंतचे हे पृथ्वीवरील सर्वात जास्त तापमान आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियात ५०.७ अंश तापमानाची नोंद झाली होती.
हवामान शास्त्रज्ञांनी इशारा देताना सांगितले की, नागरिकांना तत्काळ दिलासा मिळणार नाही. येथे काही दिवस तापमान ५० अंशांपेक्षा अधिक असेल.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, जनतेने गरज नसताना घराबाहेर पडू नये. त्यामुळे आजारी पडू शकता. कारण या भीषण तापमानात शरीरातील पाणी कमी होऊ शकते.
पाकिस्तानच्या हवामान खात्याच्या माहितीनुसार, यंदाच्या मे महिन्यात तापमान हे नियमित तापमानापेक्षा अधिक होते.
जैकबाबादचे मेमध्ये तापमान सर्वसाधारणपणे ४३.८ अंश असते. कराची शहरानेही शनिवारी दशकातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद केली. कराचीचे तापमान ४२.८ अंशांवर पोहोचले.
शेतीवर परिणाम होणार
उष्णता वाढल्याने पाकिस्तानातील पंजाब राज्याचे सिंचनमंत्री अदनान हसन यांनी सांगितले की, यंदा पाऊस व बर्फ पडल्याने सिंधू नदीतील पाणी ६५ टक्के कमी झाले.
पंजाबच्या चोलिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता असल्याने मेंढ्या मरत आहेत. याच प्रांतात जास्त गहू उत्पादित केला जाते. यंदा उष्णतेमुळे शेतीचे उत्पादन कमी होण्याची दाट शक्यता आहे.