अमेरिकेने पन्नूनच्या हत्येचा प्रयत्न उधळला

अलीकडेच बंदी घातलेल्या शीख फॉर जस्टिस या संघटनेचा पन्नून प्रमुख होता.
अमेरिकेने पन्नूनच्या हत्येचा प्रयत्न उधळला
Published on

वॉशिंग्टन : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नून याला अमेरिकेत ठार मारण्याचा भारताचा डाव होता आणि पण तो अमेरिकेने उधळून लावला, असे वृत्त ब्रिटनच्या फायनान्शियल टाईम्सने एका वृत्तात म्हटले आहे. पन्नून हा परदेशात राहून भारतविरोधी कारवाया करत होता. त्याला भारताने दहशतवादी घोषित केले होते. तसेच त्याला मारण्याचा भारतीय हेरसंस्थाचा हेतू होता. पण अमेरिकेला त्याचा सुगावा लागला आणि अमेरिकेने हा डाव उधळून लावला. तसेच भारताला असे काही कृत्य करण्याविरुद्ध समज दिली, असे या वृत्तात म्हटले आहे. अलीकडेच बंदी घातलेल्या शीख फॉर जस्टिस या संघटनेचा पन्नून प्रमुख होता.

logo
marathi.freepressjournal.in