...तर इस्रायलचा नायनाट होर्इपर्यंत हल्ले करत राहू हमासची तंबी

बेधडक विधान हमासचा ज्येष्ठ सदस्य घाझी हमाद याने करून जागतिक समुदायाच्या दबावाला जुमानत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
...तर इस्रायलचा नायनाट होर्इपर्यंत हल्ले करत राहू हमासची तंबी

तेल अवीव : ७ ऑक्टोबर रोजी ३ हजार हमास दहशतवाद्यांनी गाझा पट्टीत इस्रायलची सीमा तोडून भीषण रॉकेट हल्ला केला आणि १४०० इस्रायलींना ठार केले, तर २४५ जणांना ओलीस ठेवले. तसेच इस्रायली शहरांवर हजारो रॉकेट‌्स डागून प्रचंड विध्वंस केला. या अमानुष हल्ल्याचे समर्थन करून, संधी मिळाली तर जगाच्या नकाशावरून इस्रायल नामशेष होर्इपर्यंत असेच हल्ले पुन्हा करू, असे बेधडक विधान हमासचा ज्येष्ठ सदस्य घाझी हमाद याने करून जागतिक समुदायाच्या दबावाला जुमानत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

द टाइम्स ऑफ इस्रायलमध्ये त्याचे हे विधान छापून आले आहे. घाझी हमाद हा हमास संघटनेच्या पॉलिट ब्युरोचा सदस्य असून त्याने हे विधान लेबनॉनमधील एलबीसी टीव्ही चॅनेलला मुलाखत देताना केले आहे. त्याच्या मुलाखतीचे नंतर भाषांतर करण्यात आले. त्यानुसार घाझी हमाद म्हणतो की, इस्रायल या देशाला आमच्या भूमीत स्थान नाही. आपण हा देश नष्ट केला पाहिजे, कारण यामुळे अरब आणि इस्लामिक राष्ट्रांच्या लष्करी, सुरक्षा आणि राजकीय अस्तित्वाला धोका आहे. आम्हाला हे सांगताना अजिबात लाज वाटत नाही. इस्रायलचे अस्तित्व अतार्किक असून ते पुसून टाकले पाहिजे, अशी पुस्ती देखील या हमास सदस्याने जोडली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in