‘इस्रो’च्या रियुजेबल वाहनाचे तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग

‘इस्रो’ने रविवारी सलग तिसऱ्यांदा रियुजेबल लाँच व्हेईकल (आरएलव्ही) लँडिंग प्रयोग यशस्वी केला आहे. ‘पुष्पक’ने प्रगत स्वायत्त क्षमतांचा वापर करून जोरदार वाऱ्याच्यादरम्यान अचूक लँडिंग केले.
‘इस्रो’च्या रियुजेबल वाहनाचे तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग
ISRO

बंगळुरू : ‘इस्रो’ने रविवारी सलग तिसऱ्यांदा रियुजेबल लाँच व्हेईकल (आरएलव्ही) लँडिंग प्रयोग यशस्वी केला आहे. ‘पुष्पक’ने प्रगत स्वायत्त क्षमतांचा वापर करून जोरदार वाऱ्याच्यादरम्यान अचूक लँडिंग केले.

लँडिंग प्रयोगाची ही तिसरी आणि अंतिम चाचणी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे सकाळी ७.१० वाजता घेण्यात आली. पहिला लँडिंग प्रयोग २ एप्रिल २०२३ रोजी आणि दुसरा २२ मार्च २०२४ रोजी करण्यात आला होता. भारतीय वायुसेनेच्या चिनूक हेलिकॉप्टरने ‘पुष्पक’ला चित्रदुर्गातील एरोनॉटिकल टेस्ट रेंजमध्ये ४.५ किमी उंचीवर नेले आणि धावपट्टीवर स्वायत्त लँडिंगसाठी सोडले.

दुसऱ्या प्रयोगादरम्यान, पुष्पकला १५० मीटरच्या क्रॉस रेंजमधून सोडण्यात आले, जे यावेळी ५०० मीटरपर्यंत वाढवण्यात आले. याशिवाय या लँडिंगदरम्यान वारेही जोरदार वाहत होते. मात्र, पुष्पकने क्रॉस रेंज करेक्शन मॅन्युव्हल अंमलात आणून अचूकतेने लँडिंग केले.

logo
marathi.freepressjournal.in