तीन अमेरिकन शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्राचे नोबेल; क्वांटम टनेलिंगवरील शोधाबद्दल पुरस्कार

अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन क्लार्क, मिशेल एच. देवोरे आणि जॉन एम. मार्टिनिस यांना मंगळवारी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले. क्वांटम टनेलिंगवरील त्यांच्या संशोधनाने डिजिटल तंत्रज्ञानात मोठी प्रगती साधली गेली आहे.
तीन अमेरिकन शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्राचे नोबेल; क्वांटम टनेलिंगवरील शोधाबद्दल पुरस्कार
Published on

स्टॉकहोम : अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन क्लार्क, मिशेल एच. देवोरे आणि जॉन एम. मार्टिनिस यांना मंगळवारी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले. क्वांटम टनेलिंगवरील त्यांच्या संशोधनाने डिजिटल तंत्रज्ञानात मोठी प्रगती साधली गेली आहे.

जॉन क्लार्क यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथे संशोधन केले. मार्टिनिस यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ, सांता बार्बरा येथे, तर देवोरे यांनी येल विद्यापीठासह सांता बार्बरा विद्यापीठात संशोधन केले.

क्लार्क म्हणाले, ‘आमचे शोध काही प्रमाणात क्वांटम संगणनाचा पाया आहे. सध्या याचा नेमका उपयोग कुठे होतो हे मला पूर्णपणे स्पष्ट नाही. मोबाईल फोन कार्यरत राहण्यासाठी या संशोधनाचा मोठा वाटा आहे, असे त्यांनी सांगितले.

नोबेल समितीने सांगितले की, या शास्त्रज्ञांनी १९८० च्या दशकात केलेले कार्य आजही ‘क्वांटम क्रिप्टोग्राफी, क्वांटम कॉम्प्युटर आणि क्वांटम सेन्सर्स’ यासारख्या पुढील पिढीच्या क्वांटम तंत्रज्ञानाच्या विकासासाठी संधी निर्माण करत आहे.

जुनी क्वांटम यांत्रिकी सतत नवीन शोध लावत आहे. ती अत्यंत उपयुक्त आहे, कारण क्वांटम यांत्रिकी हे सर्व डिजिटल तंत्रज्ञानाचे पायाभूत शास्त्र आहे, असे नोबेल भौतिकशास्त्र समितीचे अध्यक्ष ऑले एरिक्सन यांनी म्हटले.

नोबेल समितीचे सदस्य आणि खगोल-भौतिकशास्त्राचे प्राध्यापक मार्क पिअर्स यांनी सांगितले, “क्वांटम संगणक हे याचे एक स्पष्ट उदाहरण आहे, पण या तंत्रज्ञानाचा वापर क्वांटम सेन्सर तयार करण्यासाठी, अतिसंवेदनशील चुंबकीय क्षेत्र मोजण्यासाठी q संमिश्र पानावर

संगणन आणि संवाद क्षेत्रात क्रांतिकारी बदल

क्वांटम यांत्रिकी हे शास्त्र सूक्ष्म कणांच्या अशक्य वाटणाऱ्या जगाचा अभ्यास करते, जिथे एकाच वेळी स्विच ऑन आणि ऑफ दोन्ही स्थितीत असतो आणि अणूंचे काही भाग अभेद्य अडथळ्यांतूनही ‘टनल’ करू शकतात. या तिघांच्या संशोधनाने या घटनेला प्रत्यक्ष तंत्रज्ञानाच्या जगात आणले, ज्यामुळे संगणन आणि संवाद क्षेत्रात क्रांतिकारी बदल होऊ शकतो. किंवा क्रिप्टोग्राफीसाठीही होऊ शकतो, ज्यामुळे माहिती तिसऱ्या पक्षाकडून सुरक्षित राहते.”

नोबेल पुरस्कार वितरण समारंभ १० डिसेंबरला होणार आहे. यावेळी नोबेल पारितोषिकासह ११ दशलक्ष स्वीडिश क्रोनर रक्कम विजेत्यांना प्रदान केली जाते.

logo
marathi.freepressjournal.in