दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे तीन जवान शहीद

दहशतवाद्यांच्या गोळीबाराला लष्कराच्या जवानांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली त्याचवेळी ही घटना घडली
दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे तीन जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे तीन जवान शहीद झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांना दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात काही दहशतवादी आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली.



दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत लष्कराचे तीन जवान गोळ्या लागल्याने जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला लष्कराच्या जवानांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली त्याचवेळी ही घटना घडली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in