ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय; जगभरातील इमिग्रंट व्हिसा अर्ज प्रक्रिया तात्पुरती स्थगित

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने ऑगस्ट महिन्यापासून जागतिक स्तरावर आपल्या सर्व दूतावास अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. या प्रशिक्षणाद्वारे अर्जदार भविष्यात...
ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय; जगभरातील इमिग्रंट व्हिसा अर्ज प्रक्रिया तात्पुरती स्थगित
ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय; जगभरातील इमिग्रंट व्हिसा अर्ज प्रक्रिया तात्पुरती स्थगित
Published on

वाॅशिंग्टन : अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने जगभरातील सर्व स्थलांतरित व्हिसा अर्जांची प्रक्रिया आणि भेटीची वेळ तात्पुरती स्थगित केली आहे. अमेरिकन सरकारी योजना व अनुदानावर अवलंबून राहू शकणाऱ्या परदेशी नागरिकांना रोखण्यासाठी आणि नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने ऑगस्ट महिन्यापासून जागतिक स्तरावर आपल्या सर्व दूतावास अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. या प्रशिक्षणाद्वारे अर्जदार भविष्यात अमेरिकन सरकारच्या ‘पब्लिक चार्ज’ श्रेणीत मोडेल का, याची कसून तपासणी केली जात आहे.

लवकरच कळवणार नवीन तारीख आणि वेळ

जगभरातील विविध दूतावासांमध्ये ज्या अर्जदारांच्या मुलाखती निश्चित झाल्या होत्या, त्यांना ईमेलद्वारे मुलाखती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांना लवकरच नवीन तारीख व वेळ कळवली जाईल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in