ट्रम्प व झेलेन्स्की यांच्यात तू-तू मैं-मैं; जगभरात खळबळ; झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊसबाहेर काढले

वॉशिंग्टन : रशिया व युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेत सुरू असलेल्या चर्चेला शुक्रवारी वेगळेच वळण मिळाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हेन्स व युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदीमीर झेलेन्स्की यांच्यात शुक्रवारी दहा मिनिटे जोरदार वाद झाला.
ट्रम्प व झेलेन्स्की यांच्यात तू-तू मैं-मैं; जगभरात खळबळ; झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊसबाहेर काढले
ट्रम्प व झेलेन्स्की यांच्यात तू-तू मैं-मैं; जगभरात खळबळ; झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊसबाहेर काढलेVideo Screenshot, x - @elonmusk
Published on

वॉशिंग्टन : रशिया व युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेत सुरू असलेल्या चर्चेला शुक्रवारी वेगळेच वळण मिळाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हेन्स व युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदीमीर झेलेन्स्की यांच्यात शुक्रवारी दहा मिनिटे जोरदार वाद झाला. यानंतर झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊसमधून बाहेर काढण्यात आले. जगातील अनेक देश युक्रेनच्या बाजूने उभे ठाकले आहेत.

वादानंतर ट्रम्प म्हणाले की, झेलेन्स्की हे चर्चा करायला तयार नाहीत. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वाल्ट‌्ज व परराष्ट्रमंत्री माईक रुबियो यांना सांगितले की, झेलेन्स्की यांना सांगा, त्यांची जाण्याची वेळ झाली आहे. त्यानंतर अमेरिकन अधिकारी झेलेन्स्की यांच्याजवळ गेले. तेव्हा झेलेन्स्की यांनी पुन्हा ट्रम्प यांच्यासोबत चर्चेची तयारी दर्शवली. परंतु त्यांना पुन्हा संधी दिली नाही. दोन्ही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषदही रद्द केली.

logo
marathi.freepressjournal.in