जेनेरिक औषधांवर २०० टक्के आयातकर- ट्रम्प; ऑगस्ट २०२८ नंतर होणार लागू, सर्वाधिक फटका भारताला

अमेरिकेत आयात केलेल्या जेनेरिक औषधांवर टप्प्याटप्प्याने मोठा आयातकर लादण्यात येईल अशी घोषणा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. त्यानुसार, पुढील दोन वर्षे आयात शुल्काचा दर शून्य टक्के राहिल्यानंतर, ऑगस्ट २०२८ पासून तो १०० टक्के आणि त्यानंतर थेट २०० टक्के केला जाणार आहे.
जेनेरिक औषधांवर २०० टक्के आयातकर- ट्रम्प; ऑगस्ट २०२८ नंतर होणार लागू, सर्वाधिक फटका भारताला
जेनेरिक औषधांवर २०० टक्के आयातकर- ट्रम्प; ऑगस्ट २०२८ नंतर होणार लागू, सर्वाधिक फटका भारताला
Published on

वॉशिंग्टन / नवी दिल्ली : अमेरिकेत आयात केलेल्या जेनेरिक औषधांवर टप्प्याटप्प्याने मोठा आयातकर लादण्यात येईल अशी घोषणा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. त्यानुसार, पुढील दोन वर्षे आयात शुल्काचा दर शून्य टक्के राहिल्यानंतर, ऑगस्ट २०२८ पासून तो १०० टक्के आणि त्यानंतर थेट २०० टक्के केला जाणार आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारताला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण भारत हा अमेरिकेला जेनेरिक औषधांचा पुरवठा करणारा सर्वात मोठा देश आहे.

'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांनी याबाबत पोस्ट केली. अमेरिकेत जेनेरिक औषध निर्मितीला पुन्हा प्रोत्साहन देण्यासाठी आणि दिलेल्या मुदतीत अमेरिकेत कारखाने व उपकरणे न उभारणाऱ्या कंपन्यांना दंड म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकन नागरिकांचे रक्षण करणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे, असे ते म्हणाले.

औषध उद्योगाला चिंता

जगभरात स्वस्त व दर्जेदार जेनेरिक औषधांचा पुरवठा करत असल्याने भारताला 'जगाचे फार्मसी' म्हटले जाते. 'ग्लोबल ट्रेड रिसर्च इन्स्टिट्यूट' च्या अहवालानुसार, भारताने २०२५ मध्ये अमेरिकेला ९.७ अब्ज डॉलर मूल्याच्या औषधांची निर्यात केली होती. ही रक्कम भारताच्या २५.८ अब्ज डॉलरच्या एकूण जागतिक औषध निर्यातीच्या तब्बल ३८ टक्के इतकी आहे. अमेरिकेत उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन), मधुमेह, कर्करोग (कॅन्सर), संसर्गजन्य आजार आणि मानसिक आरोग्याशी संबंधित आजारांवर भारतीय जेनेरिक औषधांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारतीय औषध उद्योगाला फटका बसणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in