आय लव्ह पाकिस्तान! अमेरिेकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे धक्कादायक विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४५ मिनिटे फोनवरून चर्चा झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानातील युद्ध मीच थांबवले. मोदी छान व्यक्ती आहेत. पण ‘आय लव्ह पाकिस्तान’ असे धक्कादायक विधान त्यांनी यावेळी केले. त्यामुळे ट्रम्प यांना आपले मित्र म्हणणाऱ्या मोदींना हा एक धक्का असल्याचे बोलले जात आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४५ मिनिटे फोनवरून चर्चा झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानातील युद्ध मीच थांबवले. मोदी छान व्यक्ती आहेत. पण ‘आय लव्ह पाकिस्तान’ असे धक्कादायक विधान त्यांनी यावेळी केले. त्यामुळे ट्रम्प यांना आपले मित्र म्हणणाऱ्या मोदींना हा एक धक्का असल्याचे बोलले जात आहे.

बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना मेजवानीसाठी आमंत्रित केल्याप्रकरणी ट्रम्प यांना विचारले असता ते म्हणाले की, पाकिस्तानी जनरलसोबतच्या भेटीतून राजनैतिकदृष्ट्या काय साध्य करता येईल हे मी पाहत आहे. पाकिस्तानकडून युद्ध थांबवण्यात या माणसाचा अत्यंत प्रभावशाली वाटा होता," असे ट्रम्प यांनी मुनीर यांचा उल्लेख करत सांगितले.

त्यांनी पुन्हा दावा केला की, भारत आणि पाकिस्तान या दोन मोठ्या अण्वस्त्रधारी राष्ट्रांमधील युद्ध मीच थांबवले. याबाबत फक्त मोजक्या लोकांनाच माहिती आहे.

दरम्यान, १० मे रोजी भारत आणि पाकिस्तानातील युद्धविरामाची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी दावा केला की, या दोन्ही देशांनी युद्ध न थांबवल्यास त्यांच्याशी व्यापार थांबवण्याची धमकी देऊन मी युद्धविराम घडवला.

दरम्यान, मोदी व ट्रम्प हे ‘जी-७’ परिषदेत भेटणार होते. मात्र, ट्रम्प हे परिषद अर्धवट सोडून निघून गेल्याने त्यांनी फोनवरून मोदींशी चर्चा केली.

logo
marathi.freepressjournal.in