मादुरोप्रमाणे पुतिन यांनाही उचलणार का? तशी गरज नसल्याचे ट्रम्प यांनी केले स्पष्ट

व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरो यांच्याप्रमाणे रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनाही उचलणार का, असा प्रश्न अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला असता ट्रम्प म्हणाले, “मला वाटत नाही त्याची गरज भासेल...
डोनाल्ड ट्रम्प ( संग्रहित छायाचित्र )
डोनाल्ड ट्रम्प ( संग्रहित छायाचित्र )
Published on

वॉशिंग्टन : व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरो यांच्याप्रमाणे रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनाही उचलणार का, असा प्रश्न अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला असता, “मला वाटत नाही त्याची गरज भासेल, माझे पुतिन यांच्याशी नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत, पण मी खूप निराश आहे, मी आठ युद्धे सोडवली आहेत, मला वाटले होते की, हे युद्ध सोप्या युद्धांपैकी एक असेल, असे ट्रम्प यांनी यावेळी म्हटले आहे.

ट्रम्प पुढे म्हणाले, गेल्या महिन्यात रशिया आणि युक्रेनने ३१ हजार लोक गमावले आहेत. त्यापैकी बरेच रशियन सैनिक होते. रशियन अर्थव्यवस्था सध्या खराब अवस्थेत आहे. निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, मी यावर काय बोलणार, जर हुकूमशहांबाबत (मादुरो)असे केले जाऊ शकत असेल तर अमेरिकेला माहीत आहे की, पुढे त्यांनी करायला हवे.

झेलेन्स्की यांच्या विधानावर ट्रम्प यांनी असहमती दर्शवली. ते म्हणाले की, पुतिन यांच्याबद्दल मी निराश असलो तरी अशाप्रकारची कारवाईची कोणतीही आवश्यकता नाही. विशेष म्हणजे युक्रेनमधील कथित युद्ध गुन्ह्यांबद्दल हेग येथील आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलेले आहे.

नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात अमेरिकेने ३ जानेवारी रोजी पहाटे व्हेनेझुएलाची राजधानी कराकस येथे हल्ला करून मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले. मादुरो आपल्या बेडरूममध्ये असताना अमेरिकन सैन्यांनी त्यांना बेडवरून फरफटत आणल्याचे वृत्त काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिले होते.

व्हेनेझुएलामधून अमेरिकेत मोठी ड्रग्ज तस्करी होत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता. या गुन्ह्यासंदर्भात आता मादुरो यांच्यावर अमेरिकेत खटला चालणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in