ट्रम्प-पुतिन अलास्कात १५ ऑगस्टला भेटणार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील माहिती ट्रम्प यांनी स्वतः ट्रुथ सोशलवरील एका पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. दोन्ही नेत्यांमधील ही बैठक शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी अलास्काच्या ग्रेट स्टेटमध्ये होईल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले असल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे.
ट्रम्प-पुतिन अलास्कात १५ ऑगस्टला भेटणार
Published on

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील माहिती ट्रम्प यांनी स्वतः ट्रुथ सोशलवरील एका पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. दोन्ही नेत्यांमधील ही बैठक शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी अलास्काच्या ग्रेट स्टेटमध्ये होईल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले असल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून संघर्ष सुरू आहे. रशिया सातत्याने युक्रेनच्या विविध शहरांवर हल्ले करत आहे, तर युक्रेनही रशियाला जशास तसे प्रत्युत्तर देत आहे. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून रशिया-युक्रेन संघर्ष थांबवण्यासाठी ट्रम्प हे मध्यस्थी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी पुतिन यांच्याशी फोनवरून संवाद देखील साधला होता. त्यानंतर अमेरिकेच्या युद्धबंदी प्रस्तावावर पुतिन यांनी सहमती दर्शवली होती. मात्र,काही अटी ठेवल्या होत्या.

पुतिन यांनी युक्रेनबरोबर सुरू असलेले युद्ध थांबवण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावाशी सहमत असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यांनी एक अट ठेवली होती. पुतिन यांनी म्हटले होते की, रशिया लढाई थांबवण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावाशी सहमत आहोत. पण कोणत्याही युद्धबंदीमुळे कायमस्वरूपी शांतता निर्माण झाली पाहिजे आणि संघर्षाची मूळ कारणे दूर झाली पाहिजेत. शत्रुत्व थांबवण्यासाठी युद्धबंदीच्या प्रस्तावाशी आम्ही सहमत आहोत. या वस्तुस्थितीवरून आम्ही पुढे जात आहोत, असे पुतिन यांनी याआधी झालेल्या एका बैठकीनंतर म्हटले होते.

कोणत्या विषयांवर चर्चा

दरम्यान, पुतिन आणि ट्रम्प यांच्या या भेटीत रशिया-युक्रेन युद्धबंदीसाठी तोडगा काढण्याच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. पुतिन आणि ट्रम्प यांची भेट अलास्कामध्ये होणार आहे. पुतिन यांचा अलास्काचा हा दौरा गेल्या दशकातला त्यांचा पहिलाच अमेरिकेचा दौरा असेल. ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितलं की, ते युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर पुतिन यांच्याशी चर्चा करण्याची योजना आखत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in