भारत-पाकिस्तानसह २३ देश ड्रग्ज तस्कर - ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमली पदार्थांची तस्करी आणि बेकायदेशीर अमली पदार्थ उत्पादनाच्या यादीत २३ देशांचा समावेश केला आहे.
भारत-पाकिस्तानसह २३ देश ड्रग्ज तस्कर - ट्रम्प
Published on

वॉशिंग्टन डी.सी. : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमली पदार्थांची तस्करी आणि बेकायदेशीर अमली पदार्थ उत्पादनाच्या यादीत २३ देशांचा समावेश केला आहे. या देशांमध्ये भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, कोलंबिया, बोलिव्हिया आणि व्हेनेझुएला यांचा समावेश आहे.

सोमवारी अमेरिकन संसदेत सादर केलेल्या ‘प्रेसिडेन्शियल डिटरमिनेशन रिपोर्ट’मध्ये ट्रम्प यांनी म्हटले आहे की, या देशांमध्ये बेकायदेशीर ड्रग्ज उत्पादन आणि तस्करी अमेरिका आणि त्याच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण करते.

ट्रम्प म्हणाले की, अमली पदार्थांची तस्करी, विशेषतः फेंटानिलसारखी घातक औषधे, ही अमेरिकेत एक राष्ट्रीय आणीबाणी बनली आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्य संकट निर्माण होत आहे आणि १८ ते ४४ वयोगटातील अमेरिकन लोकांमध्ये मृत्यूचे ते प्रमुख कारण आहे.

logo
marathi.freepressjournal.in